Posts

हे जीवन सुंदर आहे..

 हे जीवन सुंदर आहे.. उगवत्या भास्कराचा केशरी रंग आहे पशु-पक्षांचा सुंदर किलबिलाट आहे निर्झर झ-याचा मस्त खळखळाट आहे रणरणत्या उन्हात गार झुळुक आहे हे जीवन सुंदर आहे..... कृष्णाच्या बासरीची मोहकशी साद आहे नागमोडी वाटेतील एक वळण आहे सप्तसूरांच्या गुंफणाची ही तान आहे प्रत्येक थांब्यापाशी नवी सुरवात आहे हे जीवन सुंदर आहे... विविध नात्यांचा अनोखा असा साज आहे सुख दुःखाचे एकत्रितच ते गाणे आहे ऊन पावसाचा लपाछपीचा खेळ आहे ईश्वर निर्मित आनंदी वरदान आहे हे जीवन सुंदर आहे.... © सौ. सुजाता कुलकर्णी